धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

Pimpalner

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आज (दि.२९) साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे विविध आदिवासी संघटनांनी कडकडीत बंद पाळला. आज सकाळी शहरातील मुख्य मार्गावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डोंगरभाऊ बागुल यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली बसस्थानक, सटाणा रोड, गोपाळ नगर, नाना चौक, मुख्य बाजारपेठ, खोल गल्ली मार्गे काढण्यात आली.

यावेळी मणिपूर सरकार व केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करावी. कुकी महिलांची नग्नावस्थेत धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अशोक सोनवणे, प्रेमचंद सोनवणे (आदिवासी एकता परिषद), डॉ. प्रतिभा देशमुख, लखन पवार (आदिवासी परिवार), काँग्रेसचे युवा नेते प्रविण चौरे (सामाजिक कार्यकर्ते), धर्मेंद्र बोरसे (एकलव्य भिल संघटना), देविदास सोनवणे (सरपंच पिंपळनेर), सभापती संजय ठाकरे, गणेश गावित, कुंदन गांगुर्डे, अजय राऊत, तानाजी बहीरम, लक्ष्मी देसाई (सरपंच चिंचपाडा), प्रियंका बारीस (सरपंच बसरावळ), सुनिता पवार, विनोद मोरे, सामोडे येथील कृषी असोसिएशनचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. नरेंद्र भदाणे आदीसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा 

The post धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद appeared first on पुढारी.