धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

संत तुकाराम महाराजांनी कोट्यवधींची सावकारीची उधारी कोणाकडूनही मागितली नाही. महाजनकीच्या वह्या इंद्रायणीमध्ये विसर्जित केल्या. शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज असल्याचे मत शिवव्याख्याते डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी मांडले.

धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने पांझरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ सुलभाताई कुंवर या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सुर्यवंशी, व्हि. के. भदाणे, अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष रमेश बोरसे, नुतन पाटील होते. मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले.

सामान्य माणसांमध्ये देव बघणारे,गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी पुढे येणारा माणूस खऱ्या अर्थाने साधू असतो, त्याच्यातच देव असतो, देव कोण्या दगडात नसतो किंवा चमत्कारात नसतो ही शिकवण तुकाराम महाराजांनी दिली. धर्माप्रती, संस्कृतीप्रती परंपरागत आपली श्रद्धा नक्की असावी मात्र ती चिकित्सक स्वरूपाची असली पाहिजे. या भूमिकेतून तुकाराम महाराज प्रबोधनाचे कार्य करत होते. प्रबोधन करताना तरूणांना उपदेश करून छञपती शिवाजीराजांच्या सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देत असत. त्यामुळे असंख्य निष्ठावंत मावळ्यांच्या फौजा छञपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळत. परंपरागत सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी कोट्यावधींची सावकारीची उधारी कोणाकडूनही मागितली नाही. आपल्या महाजनकीच्या वह्या इंद्रायणीमध्ये विसर्जित केल्या. तुकाराम महाराजांचे विचार जीवनाला कलाटनी देतील असे विचार आहेत. म्हणून आपण ते अंगीकारावे, आत्मसात करावे व जगावे, अंधश्रद्धेला बाजूला सारुन विज्ञानवादी व विवेकवादी होणे बहुजनांच्या लेकरांचे हिताचे असल्याने महापुरुषांना चमत्कारी बनवण्यापेक्षा आपले आदर्श बनवावे. तुकाराम महाराजांचे खरे चरित्र अभ्यासावे असे आवाहन शिवव्याख्याते डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी यावेळी केले.  एस एम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ सुनिल पवार, अनंत पाटील , मिलन पाटील, ज्ञानेश्वर पाटील,प्रा मोरे,प्रा विजय पाटील,बी ए पाटिल, डॉ संजय पाटील, पी एन पाटील, प्रविण पाटील, प्रा के बी पाटील, संजय पाटील, नितीन पाटील,वाघ , आनंद पवार ,डि ए पाटील, जयप्रकाश पाटील, जितेंद्र भामरे,राहुल देवरे, संतोष मंडाले, उषाताई नांद्रे, वसुमती पाटील, उषाताई साळुंखे, जगन ताकटे,सुधाकर बेंद्रे, डॉ.बेहेरे, शाम निर्गुडे, हेमंत भडक, सुनील ठाणगे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी appeared first on पुढारी.