नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले

लॉकअपमधून पाच आरोपी फरार, www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

दरोड्याच्या गुन्ह्यातील अटक केलेले पाच आरोपी पोलीस ठाण्यातील लॉकअपची खिडकी तोडून पसार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे घडली असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना नवापूर पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. परंतु खिडकी तोडून त्यांनी पलायन केल्याचे पोलिसांना आढळून आले. नवापूर पोलीस ठाण्याची लॉकअप असलेली इमारत ब्रिटिश कालीन व जुनाट आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांची वर्दळ असताना आरोपी पलायन करण्यात यशस्वी कसे काय होऊ शकले? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक वारे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आज सोमवार(दि. 5) डिसेंबर 2022 रोजी पहाटे पाचवाजे दरम्यान त्या आरोपींना अटक करुन लॉकमध्ये बंद करण्यात आले होते. त्यांनी पलायन केल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पथक रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले appeared first on पुढारी.