नाशिकमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

नाशिक : पुढारी ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल, असा निर्णय निवडणूक आयोगाने काल (दि. 7) दिला. या निर्णयाचे नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मुंबई नाका येथील कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात व पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.

 

The post नाशिकमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह appeared first on पुढारी.