नाशिकरोड ‘अमृत’ उद्यानातील चंदनाच्या वृक्षांची तब्बल तिसऱ्यांदा चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलरोड परिसरातील निसर्गरम्य म्हणून ओळख असलेल्या ‘अमृत’ उद्यानात तब्बल तिसऱ्यांदा चंदनाच्या वृक्षांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .

चंदनाच्या वृक्षांची चोरी झाल्याची घटना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी तातडीने माजी नगरसेवक अशोक सातभाई यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती त्यांना दिली. त्यांनी त्वरीत पोलीस प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांना याविषयी कळवावयास सांगितले. तसेच उद्यानाच्या सुरक्षेसाठी महापालिका अधिकाऱ्यांनी लक्षपूर्वक यासाठी दावा मांडला जाईल असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले. दरम्यान मागील काही दिवसांपासून अमृत उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होताना दिसत आहीे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. अशी तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. उ्दयान विभागाचे निरीक्षक हे कार्यालयात बसूनच कागदोपत्री कामकाज पहात असतात. त्यांनी अमृत उद्यानाकडे लक्ष देऊन येथील उद्यानाची झालेली दुरवस्था बघावी. अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

उद्यानातील समस्या अशा…

निसर्गरम्य उ्दयानाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्ते उखडले गेले आहेत. येथील मौल्यवान वृक्षसंपदा तसेच हिरवीगार लॉन्स उन्हाळ्यात पाण्याअभावी पूर्णपणे जळून गेली आहे. वॉचमन नसल्यामुळे उ्दयानाच्या प्रवेशव्दार दिवसभर खुला असतो. ठिकठिकाणी उ्दयानाच्या संरक्षक कंपाऊंड ताराही तोडलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणीं उपद्रवी जोडपे आत येऊन बसतात. उ्दयानातील स्वच्छतागृह देखील अतिशय अस्वच्छ झाले असून ते कायम कुलूपबंद असते. त्यामुळे विशेष करून फिरायला येणाऱ्या महिला वर्गाचे प्रचंड हाल होतात. काही माता भगिनींना डायबेटिकचा त्रास आहे. त्यांना तर अशावेळी खूपच त्रास सहन करावा लागत आहे. येथील माळी तसेच वॉचमन नसल्यामुळे अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्षामुळे उद्यानाची दुरावस्था

निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे सद्यस्थितीत लोकप्रतिनिधींकडे तक्रार करता येत नाही. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष द्यायला हवे. पात्र अधिकारी वर्ग समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे उद्यानाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.

अशोक सातभाई, माजी नगरसेवक जेलरोड www.pudhari.news
अशोक सातभाई, माजी नगरसेवक जेलरोड www.pudhari.news

महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात. कोट्यवधी रुपये खर्च करून ‘अमृत’ उद्यान विकसित केले आहे. नाशिकरोड परिसरातील अतिशय सुंदर अशी वास्तू म्हणून येथील ‘अमृत’ उद्यानाकडे पाहिले जाते. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्याकडे लक्ष दिले नाही तर या प्रश्नावर आम्ही लवकरच आंदोलन करू. – अशोक सातभाई, माजी नगरसेवक.

हेही वाचा:

The post नाशिकरोड 'अमृत' उद्यानातील चंदनाच्या वृक्षांची तब्बल तिसऱ्यांदा चोरी appeared first on पुढारी.