नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा

कुत्रा चावा www.pudhari.news

नाशिक (चांदवड) – पुढारी वृत्तसेवा

चांदवड शहरात शुक्रवार (दि. 27) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या चार मुलांना चावा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये भटक्या श्वानांप्रती भीती वाढली आहे. जखमी मुलांना माजी नगरसेवक नवनाथ आहेर यांनी तत्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर औषधोपचार केले. चांदवड शहरात मोकाट कुत्रे व पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने रस्त्याने पायी चालणे अवघड झाले आहे. त्यामुळे  पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा नगरपरिषद प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जखमी मुलांचे नावे अशी…
योगेश बाळू पवार (बस स्टॅन्ड हरसुल); सानिया संदीप कोकाटे (लक्ष्मी नगर); काव्या (नाशिक); कृष्णा लक्ष्मण जाधव (तळवाडे रोड).

हेही वाचा:

The post नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा appeared first on पुढारी.