नाशिक : अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर

नाशिक

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपुर -अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म जवळ आज (दि.२७) पहाटे ६ वाजेच्या दरम्यान तिघे विद्यार्थी दुचाकीवरुन सातपुरकडे  दहावीच्या क्लाससाठी जात असताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघात एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अन्य दोघे गंभीर जखमी आहे.

सातपुर अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल परिसरातील सार्थक दामोदर रहाणे, योगेश गणेश केणे व भावेश गणेश केणे हे तिघेही सातपुर कडे दहावीच्या क्लासला जात असताना ज्योती फार्म ते नासर्डी पुला दरम्यान हा अपघात झाला. अज्ञान वाहनाने कट मारल्याने या विद्यार्थ्यांची दुचाकी डिव्हायडरला धडकली. या अपघातात सार्थक दामोदर रहाणे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सोबत असलेले योगेश केणे व भावेश केणे हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. कालपासुन सुरू झालेल्या रिपरिप पावसाने रस्ते निसरडे झालेले आहेत. औद्योगिक तसेच रहिवासी क्षेत्रातील वाहनांची मोठी वर्दळ, यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या घटनेमुळे सातपुर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे, पुढील तपास सातपुर पोलिस करीत आहे..

हेही वाचा : 

The post नाशिक : अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर appeared first on पुढारी.