नाशिक : लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत

मेट तर्फे भेट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना सदनिकेसाठी दीड लाख रुपयांची मदत मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे देण्यात आली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे कर्डक कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.

लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना शासनामार्फत सदनिका देण्यात आली होती. मात्र ही सदनिका ताब्यात घेण्यासाठी या कुटुंबीयांकडे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची घरासाठी परवड सुरू होती. याबाबत माहिती मिळताच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व विश्वस्त समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक दायित्वातून तातडीने दीड लाख रुपयांची मदत कर्डक कुटुंबीयांना भेट दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी भवन येथे त्यांच्या हस्ते कर्डक कुटुंबीयांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या मदतीबद्दल कुटुंबीयांनी मेट भुजबळ नॉलेज सिटी व भुजबळ कुटुंबीयांचे आभार मानले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, आ. माणिकराव कोकाटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, दिलीप खैरे, नाना महाले, डॉ. अपूर्व हिरे, गजानन शेलार, कविता कर्डक, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत appeared first on पुढारी.