नाशिक : आसोदा गोळीबाराने हादरले; पूर्व वैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला

गोळीबार ,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

खुनातील संशयित तथा पोलिस दफ्तरी कुविख्यात असलेल्या चिंग्याने आसोदा येथील हॉटेलबाहेर बसलेल्या तरुणावर तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री घडल्याने जळगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा व जळगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत.

चिंग्या उर्फ केतन सुरेश आळंदे (रा.आसोदा) व कयुब उर्फ कैलास पंढारे (रा. शिवाजी नगर, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर योगेश दिगंबर कोल्हे (रा. आसोदा) असे गोळीबारातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळील हॉटेल आर्याजवळील रीकाम्या बाकांवर योगेश कोल्हे हा तरुण बसला होता. यावेळी संशयित कैलास व चिंग्या हे दुचाकीवरून गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री घटनास्थळी आले. यावेळी चिंग्याने ताब्यातील गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. मात्र फायर मिस झाल्याने योगेश बचावला. गोळीबारानंतर संशयित पसार झाले. गोळीबार करणार्‍या चिंग्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून खुनाच्या गुन्ह्यातून अलीकडेच डिसेंबरमध्ये बाहेर आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी धाव घेतली.

हेही वाचा:

The post नाशिक : आसोदा गोळीबाराने हादरले; पूर्व वैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.