नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार

एनडीसीए प्रोफेशनल लीग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘एनडीसीए प्रोफेशनल लीग २०२२-२३’चा थरार १५ ते १८ जून या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेत नाशिकमधील आठ संघांत एनडीसीएच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब व महात्मानगर क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत डॉक्टर्स, आर्किटेक्टस्, सीए, वकील, बिल्डर्स, इंजिनिअर्स, उद्योजक, व्यावसायिक आदी क्षेत्रात काम करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत.

एनडीसीए प्रोफेशनल लीगमध्ये एव्हरशाइन ए. बी., मराठा वॉरिअर्स, स्ट्राईकर्स, आर्किटेक्टस् इलेवन, सनराइज, स्माशर्स, एव्हरशाइन विराट, नाशिक कोचेस आदी संघांचा समावेश आहे. गुरुवारी (दि.१५) सकाळी आठ वाजता गोल्फ क्लबवर एव्हरशाइन ए. बी. विरुद्ध मराठा वॉरिअर्स, तर महात्मानगर क्रिकेट मैदानावर स्ट्राईकर्स विरुद्ध आर्किटेक्टस् इलेवन या सामन्यांनी एनडीसीए प्रोफेशनल लीग स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. दरम्यान, एनडीसीए प्रोफेशनल लीग स्पर्धेचे लाइव्ह प्रक्षेपण ‘स्पोर्टवोट’तर्फे करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेने केले.

हेही वाचा:

The post नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार appeared first on पुढारी.