नाशिक : करंजवण शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृतदेह आढळला,www.pudhari.news

वणी (जि. नाशिक) : करंजवण शिवारात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला असून, अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे. दरम्यान मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लखमापूर-कोशिंबे या रस्त्यावरील लगतच्या चारीत अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या अज्ञाताचा मृतदेह आढळला आहे. करंजवण पोलिसपाटील संदीप शार्दुल यांनी वणी पोलिसांना ही माहिती दिली. शरीराने मजबूत, चेहरा गोल, रंगाने काळा सावळा, केस काळे व लांबट, दाढी-मिशी वाढलेली, अंगात पोपटी हिरव्या रंगाचा हाफ शर्ट, जांभळ्या रंगाची नाइट पँट, डाव्या हातावर अजय नाव, उजव्या हातावर आई नाव गोंदलेले आहे, असे मृताचे वर्णन आहे. याबाबत अधिकृत माहिती असल्यास वणी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : करंजवण शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.