नाशिक : घराला पाणी मारत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

मृत्यू ,www.pudhari.news

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा 

स्वतःच्या घराच्या बांधकामास पाणी मारत असतांना विजेचा धक्का लागून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लखमापूर, ता. दिंडोरी येथे घडली आहे.

लखमापूर येथे रविवार, ता. ११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास रविंद्र गोपिचंद पवार (३८) दिंडोरी तालुक्यातील लखमापुर गावात त्यांच्या घराचे बांधकाम चालु असल्याने बांधकामावर पाणी मारत असतांना त्यास इलेक्टिक शॉक लागून खाली पडला.  त्यास  ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे औषध उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. रायते यांनी तपासून मयत घोषित केले.

या घटनेची माहिती वणी पोलीस ठाण्यात महेश पुंडलिक थाटशृंगार यांनी दिली त्यानुसार पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास वणी पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, कमलेश देशमुख, कुणाल मराठे आदीसह तपास करीत आहे. लखमापूर गावातील तरुण मुलाचे असे दुर्दैवी निधन झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : घराला पाणी मारत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.