नाशिक : कार घेण्यासाठी पत्नीकडे 10 लाखांचा तगादा; पतीविरोधात गुन्हा

विनयभंग ,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

स्विफ्ट कार घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिलेचा विवाह दि. ७ जुलै २०१६ रोजी प्रशांत जगन्नाथ मांदळे ( वय ३८) याच्याशी झाला होता. तेव्हापासून विवाहिता दि. २८ मार्च २०२३ पर्यंत सासरी नांदत होती. त्यादरम्यान पती प्रशांत मांदळे, सासू मंगल जगन्नाथ मांदळे (वय ५५), सासरे जगन्नाथ किसन मांदळे (वय ५९), मोठा दीर प्रवीण मांदळे (वय ४०), जाऊ वैशाली मांदळे व लहान दीर सागर मांदळे (वय ३२, सर्व रा. हनुमान चौक, महाराणा प्रताप चौक, सिडको, नाशिक) यांनी संगनमत करून स्विफ्ट कार घेण्यासाठी तुझ्या आईवडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये, तरच तुला नांदवू, असे म्हणून तिला त्रास देणे सुरू केले.

दरम्यान, पीडित विवाहितेने सन २०१६ मध्ये वडिलांकडून आणलेली पाच लाख रुपयांची रोकड दिल्यानंतरही उर्वरित रकमेसाठी पती व सासरच्या सर्वांनी संगनमत करून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली, तसेच शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत त्याचा अपहार केला. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : कार घेण्यासाठी पत्नीकडे 10 लाखांचा तगादा; पतीविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.