नाशिक : क्रिकेटच्या मैदानात छगन भुजबळ यांची जोरदार फटकेबाजी

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

आरडी सर्कल येथे नाशिक केमिस्ट असोसिएशन आयोजित अप्पासाहेब शिंदे क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन करताना छगन भुजबळ यांनी जोरदार फटकेबाजी केली.

अप्पासाहेब शिंदे यांनी केमिस्ट संघटनेचा पाया रचला. त्यांनी राज्यभरात अतिशय यशस्वी संघटन त्यांनी केले. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी संघटनेच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली, अशा शब्दात भुजबळ यांनी शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपक जाधव, सचिव शरद धनवटे, नितीन वानखेडे, फार्मसी कौन्सिलचे अतुल अहिरे, रवींद्र पवार, देवरगांवकर यांच्यासह केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : क्रिकेटच्या मैदानात छगन भुजबळ यांची जोरदार फटकेबाजी appeared first on पुढारी.