नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा

online fraud

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने भामट्याने युवकास ऑनलाइन पद्धतीने सुमारे पावने तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी संजय छनुलाल सेऊत (२५, रा. कामगार नगर, सातपूर) याने सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.

संजय यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने १८ ते २१ एप्रिल दरम्यान इंटरनेट व फोनवरून गंडा घातला. संजय यांचे गुगल पे खाते ब्लॉक झाल्याने ते सुरु करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी भामट्याने त्यांच्याशी संपर्क साधून खाते सुरु करून देण्याच्या बहाण्याने संजय यांच्याकडील डेबीट कार्डची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे भामट्याने संजय यांच्या बँक खात्यातील २ लाख ७१ हजार १०२ रुपयांची रोकड परस्पर काढून घेत संजय यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा appeared first on पुढारी.