नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

चांदवड अपघातात दोन तरुण ठार, www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

शिवारातील आहेर वस्तीजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीला अनोळखी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत चांदवड शहरातील दोन तरुण जागीच गतप्राण झाले.

येथील हृषिकेश सोनवणे (२४) व स्वप्निल सोनवणे (२८) हे दोघे रविवारी (दि. २९) दुचाकीने मालेगावला गेले होते. मालेगाव येथून चांदवडला येताना शहराच्या शिवारातील आहेर वस्तीजवळ रात्री १०.३० च्या सुमारास मागच्या बाजूने भरधाव आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील ऋषिकेश व स्वप्निल हे दोघे महामार्गावर कोसळले. त्यात दोघांना गंभीर दुखापत झाली. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने भरधाव येणारी वाहने या दोघांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, अपघातग्रस्तांना एकाही चालकाने मदत केली नाही. अपघाताची माहिती मिळताच सोमा टोल वेज कंपनीचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

पाकिस्तानमध्ये मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात 52 ठार

अपघातात मृत झालेल्या दोघांचा चेहरा पूर्णपणे खराब झालेला असल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांना अवघड झाले होते. दुचाकीच्या नंबरवरून मृतांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतांच्या घरच्यांनी एकच टाहो फोडल्याने उपजिल्हा रुग्णालयात वातावरण सुन्न झाले होते. सोमवारी (दि. ३०) सकाळी 11 ला दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताबाबत माधव नारायण सोनवणे (५२) यांनी चांदवड ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मन्साराम बागूल अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.