नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या  एका रिक्षाचालकाचा खुन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे . शंकर गाडगीळ ( वय ३८ ) असे ठार केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चुंचाळे घरकुल योजना भागात रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक याने शंकर गाडगीळ ( वय ३८ ) याच्या डोक्यात दांडूका मारल्याने गंभीर जखमी झाल्याने मृत्यु झाला आहे . जखमी गाडगीळ यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले . या प्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार व पथक घटनास्थळी धाव घेतली व दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे . मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे घरकुल भागात राहणारे आहेत . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत .

The post नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात appeared first on पुढारी.