विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी खरे योगदान आई वडिलांचे ; मुख्याध्यापक संजय धिवरे

देवळा www.pudhari.news

देवळा : पुढारी वृत्तसेवा;  विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी खरे योगदान आई वडिलांचे असून, त्यांच्या प्रेरणेने अनेकांनी उतुंग भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या त्यांच्या जडणघडणीत प्रेरणा, आत्मियता व संकल्पनेतून स्वामी विवेकानंद
सारख्या महापुरुषांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभले आहे. आपल्या आई वडिलांची आपल्याबद्दलची आत्मीयता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ध्येय बाळगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जोरण विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय धिवरे यांनी केले.

खर्डे ता. देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. १०) रोजी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण  धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सरपंच जीभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव, स्कुल कमिटीचे अध्यक्ष राहुल देवरे, उपाध्यक्ष हेमराज सोनवणे,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर देवरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत ठाकरे, प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, माधव ठोंबरे, सुरेश जाधव, कारभारी जाधव, पोलीस पाटील भरत जगताप, गोविंदा सोनवणे, भाऊसाहेब मोरे, भानुदास जगताप, शशिकांत पवार आदींसह प्राध्यापक संजय आहेर,  एच. एन सोनवणे, उपशिक्षक आर एन आहिरे, एस के बागुल, पी ए देवरे, पी के दळवी, आर एम पवार, एम बी जाधव,  व्ही. एम. पाटील, एस के आहिरे, के व्ही क्षेत्रीय तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य दिलीप रणधीर यांनी केले तर आभार कैलास चौरे यांनी मानले. दरम्यान, खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयासाठी ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकीन मशिन भेट दिले. याबद्दल प्राचार्य दिलीप रणधीर यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा :

The post विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी खरे योगदान आई वडिलांचे ; मुख्याध्यापक संजय धिवरे appeared first on पुढारी.