नाशिक : जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर धनसिद्धिविनायकचे वर्चस्व

जिल्हा केमिस्ट असोसिएशन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या शहर व जिल्ह्यातील 25 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला आहे.

रविवारी (दि.16) झालेल्या 70 टक्के मतदानानंतर 12 तास चाललेल्या मतमोजणीत धनसिद्धिविनायक पॅनलने प्रतिस्पर्धी समर्थ पॅनलचा दारुण पराभव करत निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. शहरातील 25 पैकी 23 जागांवर धनसिद्धिविनायक पॅनलने विजय मिळवला. तालुका सदस्यांमध्येही 15 जागांपैकी धनसिद्धिविनायकचे बहुमताने सदस्य निवडून आले आहेत. नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनची 2022 ते 2025 या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक झाली. स्टेट फार्मसी कौन्सिलचे सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष अतुल अहिरे, माजी सचिव योगेश बागरेचा यांच्या धनसिद्धिविनायक पॅनलसमोर माजी अध्यक्ष गोरख चौधरी यांच्या समर्थ पॅनलने लढा दिला. शहर जिल्ह्यातील सात हजार सदस्यांपैकी 70 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जुना गंगापूर नाका येथील धनदाई लॉन्स येथे धर्मादाय आयुक्तालयाचे निरीक्षक धम्मपाल इगवे व निरीक्षक श्रीनिवास मांडवगणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया झाली.

शहरातील विजयी उमेदवार
प्रशांत पूरकर (पंचवटी), मंगेश मेतकर (सातपूर), योगेश पांडे (द्वारका), सीमा पवार (देवळाली कॅम्प), मनोज लोढा (सिडको), विनोद बाविस्कर (सिडको), अमित कवडे, उमेश पवार (नाशिकरोड), शहरातून प्रफुल्ल पारख, अतुल नागरे, मयूर मणियार, दीपक जाधव, नीलेश शिरुडे, योगेश कदम, उमेश वरखेडे, राहुल ब—ाह्मणकर, सुनील पवार, यादव जाधव, शरद धनवटे, मीनल गिढीया विजयी झाले आहेत. धनसिद्धिविनायक पॅनलचे शफीक अब्दुल शेख यांचा पराभव झाला. समर्थ पॅनलचे शशांक बागड
विजयी झाले.

चुरशीची लढत
नाशिक शहरातील 21 जागांसाठी चुरशीची लढत झाली. धनसिद्धिविनायक पॅनलचे अतुल अहिरे, योगेश बागरेचा, रत्नाकर वाणी या तिघांनी विजय मिळवला. समर्थ पॅनलकडून गोरख चौधरी यांचा विजय झाला. अहिरे गटाकडून संदीप शेवाळे यांचा, तर चौधरी यांच्या पॅनलमधील राजेंद्र धामणे, नितीन झंवर, रमेश बोरस्ते यांचा पराभव झाला.

तालुकानिहाय विजयी सदस्य
प्रवीण बधान (बागलाण), अरुण काळे (येवला), सुनील बोगावत (नांदगाव), सुदेश अहिरे (निफाड), सचिन वाळुंज (सिन्नर), किरण छाजेड, आरिफ अहमद सिराज अहमद (मालेगाव), प्रकाश थोरात (दिंडोरी), नितीन देवरगावकर (त्र्यंबकेश्वर) हे निवडून आले. तर जयंत महामिने (पेठ), सचिन महाले (सुरगाणा), नितीन वालखेडे (कळवण), अतुल जाधव (चांदवड), गणेश निकम (देवळा), रामदास गव्हाणे (इगतपुरी) बिनविरोध निवडून आले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर धनसिद्धिविनायकचे वर्चस्व appeared first on पुढारी.