नाशिक : जिल्हा सरकारी बँकेच्या निवडणुकीचे आज होणार चित्र स्पष्ट

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असून मंगळवार (दि.20) माघारीचा अखेरचा दिवस असल्याने अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. समता पॅनल आणि सहकार पॅनल अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असल्याचे समोर येत असून प्रचाराला देखिल सुरुवात झाली आहे. आज माघारीचा अखेरचा दिवस असतानाच समता पॅनलने सोमवारी (दि १९) आपले पॅनेल घोषित केले तर सहकार पॅनलने एक दिवस वेळ घेतला आहे. अंतिम यादी 21 जून रोजी प्रसिध्द केली जाईल.

समता पॅनलतर्फे सुधीर पगार, विजयकुमार हळदे, दीपक आहिरे, प्रविण भाबड, प्रशांत गोवर्धने, प्रशांत कवडे, विजय खातळे, शशिकांत वाघ, सुरेश चौधरी, राजेश निकुंभ, सतिश भोरकडे, गफुर बेग मिर्झा, गणेश वाघ, अमित आडके, प्रितीश सरोदे, संदीप दराडे, हेमंत देवरे, अमित पाटील, प्रदिप आहिरे, मंगला ठाकरे, सरिता पानसरे यांची उमेदवारी घोषित झाली आहे, असे पॅनेलचे प्रणेते रमेश राख, भाऊसाहेब खातळे यांनी सांगितले.

सहकार पॅनलकडून देखील हालचाली जोरात आहे. सहकार पॅनलतर्फे रविंद्र आंधळे, विक्रम पिंगळे, प्रमोद निरगुडे, अजित आव्हाड, मोठाभाउ ठाकरे, विजू देवरे, सचिन विंचुरकर, मंदाकिनी पवार, भरत राठोड, सुनिल गिते, जयंत शिंदे, निलेश देशमुख, ज्ञानेश्वर माळोदे यांची उमेदवार जवळपास निश्चित मानली जात आहे. प्राप्त अर्जांची सोमवारी निवडणूक अधिकारी गौतम बलसाने यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यात केवळ तीन अर्ज बाद ठरले आहे. सूचकाची स्वाक्षरी नसणे, प्रतिज्ञापत्रक भरले नसल्याने हे अर्ज बाद झाले आहेत. वैध नामनिर्देशन पत्रांची यादी मंगळवारी निवडणूक कार्यालयात प्रसिध्द झाली. माघारीनंतर अंतिम यादी 21 जून रोजी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना निशाणीचे वाटप केले जाईल. 2 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा सरकारी बँकेच्या निवडणुकीचे आज होणार चित्र स्पष्ट appeared first on पुढारी.