नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

सिडको www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत डी झोनमध्ये असणाऱ्या चिकट टेप तयार करणाऱ्या साई एंटरप्रायजेस कंपनीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या कच्च्या मालासह सहा ते सात मशीनरी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 21) रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली होती.

अग्निशमन विभागाच्या दोन ते तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेत पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. अंबड औद्योगिक वसाहतीत पाॅवर हाउसमागील परिसरात डी ४९ समोर सूरज कोठावदे यांच्या मालकीची ही कंपनी आहे. कंपनीत विविध प्रकारचे चिकट टेप तयार केले जातात. रविवारी (दि. 21) रात्री 12.30 च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने कंपनीत मोठ्या प्रमाणात आग लागली. आग लागल्याची माहिती समजतात अंबड औद्योगिक वसाहत व सिडको असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही चिकट टेप तयार करण्यासाठी लागणारा आठ ते दहा लाखांचा कच्चा माल तसेच इन्शुलीन मशीन, कटिंग मशीन, सेटिंग मशीन, कोर कटिंग मशीन अशा सहा ते सात मशीनरी पूर्णपणे जळून खाक झाल्या. या आगीत २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी पंचनामा केला आहे. अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे पोलिस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग appeared first on पुढारी.