नाशिक जिल्ह्यात दादा, उबाठा गटांना समसमान कौल

ग्रामपंचायत निवडणूक निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी झालेल्या 48 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 6) जाहीर झाले. यात तीन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या असून, 45 पैकी 8 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाने, तर शिवसेना (उबाठा) गटाने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखत गावगाडा आपल्या ताब्यात ठेवला आहे.

ग्रामपंचायतींच्या 44 थेट सरपंच, सदस्यांचा 200 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी तालुकास्तरावर मतमोजणीस सुरुवात झाली. यात एकूण 45 ग्रामंपाचयतीपैंकीचे निकालात अजित पवार गट- 8, शिवसेना (उबाठा) -8, भारतीय जनता पक्ष- 6, शिवसेना (शिंदे गट) 5, कॉंग्रेस- 4, मनसे – 3 तर 10 ग्रामपंचायती अपक्षांच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कौल अजित पवार व उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगावला जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व

जळगाव :जिल्ह्यातील शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, दोन नंबरला भाजप, तर तीन नंबरला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तिन्ही आमदारांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये गड राखले. जिल्ह्यात शिंदे गट 63, राष्ट्रवादी 11, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 22, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तीन, काँग्रेस चार, प्रहार एक, तर अपक्षांनी १६६ जागा जिंकल्या आहेत.

धुळ्यात २५ ग्रामपंचायतींवर भाजप

धुळे : जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचातीपैंकी २५ ठिकाणी भाजपचा झेंडा फडकविला आहे असून भाजपवर जनतेने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी व्यक्त केली.

शिरपूर तालुक्यातील १५ पैकी १३, शिंदखेडातील १३ पैकी ११, तर साक्रीत ३ पैकी २ ग्रामपंचायतींवर भाजप विजय झाला. यांनी दिली आहे.

 

The post नाशिक जिल्ह्यात दादा, उबाठा गटांना समसमान कौल appeared first on पुढारी.