नाशिक : तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढला ओढा

तंत्रशिक्षण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
किमान वेतन, बोनस, नियमित होणारी वेतन या कारणांमुळे तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मागील तीन वर्षांत तंत्रशिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत वाढ झाली असून, पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला दरवर्षी सरासरी एक हजाराने वाढल्याचे चित्र आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विक्रमी 7 हजार 48 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन वर्षांमध्ये तंत्रशिक्षणाला प्राधान्य दिल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेश प्रक्रियेनंतर पदविका अभ्यासक्रमात 7 हजार 48 प्रवेश झालेले आहेत. अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे स्पष्ट होत असून, पॉलिटेक्निक महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजली आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही तंत्रशिक्षणाला पसंती मिळत असल्याने या अभ्यासक्रमाच्या कक्षा वृंदावण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, डिप्लोमामध्ये विद्यार्थी संख्या वाढत असताना, इयत्ता अकरावीच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी 63 कनिष्ठ महाविद्यालयांत 26 हजार 480 जागा उपलब्ध होत्या. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 हजार 804 जागा रिक्त राहिल्या आहेत. अकरावीच्या कॅप राउंडच्या 6838, तर कोट्याच्या राखीव जागांपैकी 966 जागा रिक्त आहेत.

प्रवेशाची आकडेवारी याप्रमाणे…
शैक्षणिक वर्ष                    उपलब्ध जागा                  प्रवेश
2020-21                         9,254                               5,178
2021-22                         9,006                               6,152
2022-23                         8,850                               7,048

हेही वाचा:

The post नाशिक : तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढला ओढा appeared first on पुढारी.