नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक

मोटरसायकल चोरी

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा तालुक्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक करण्यात आली. तर एक आरोपी फरार झाला आहे. तिघा आरोपींना शनिवारी (दि.24) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

येथील नामदेव वाघमारे (रा. गोपाळनगर, ता. सुरगाणा) यांनी दुचाकी (जीजे 15 डीबी 4814) चोरीची फिर्याद सुरगाणा पोलिस ठाण्यात दाखल केली. या तपासामध्ये दिगंबर धुळे (20, रा. खोबळा), योगेश कनोजे (20, रा. खोबळा, सुरगाणा), कपील चौधरी (21, रा. जांभीपाडा, सुरगाणा) यांना अटक केली. तर गणेश गांगुर्डे (21) हा फरार झाला आहे. त्यांचा कसून तपास केला असता यामाहा आर 15, बजाज पल्सर, बजाज पल्सर 125, हिरो कंपनीची सप्लेंडर या चार दुचाकी बिना नंबर प्लेट मिळून आल्या. असा एकूण दीड लाख रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शनिवारी (दि.24) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. तर पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किरण बैरागी, संतोष गवळी, रमेश चव्हाण, नितीन ढेपले करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक appeared first on पुढारी.