नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये, देवळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी धाडी टाकत धडाकेबाज कारवाई केल्याने अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य जनतेने मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे.
या बाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदया बाबत गोपनीय रित्या माहिती घेवुन सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, सहा.पो.उप.निरी विनय देवरे, पो.ना. भारकर सोनवणे, म.पो.ना. ज्योती गोसावी यांच्या टीमने तालुक्यात एकाचा दिवशी पाच ठिकाणी धाडी टाकत कारवाई केली. यात पिंपळगाव वाखारी येथील एका पान स्टॉल वरून १ हजार ७३१ रू चा विवीध प्रकारचा महाराष्ट्रात बंदी असलेला पानमसाला गुटखा, खारीपाडा येथून १हजार ५० रू किंमतीच्या देशी क्वॉर्टर, उमराणे येथील आदिवासी वस्ती येथून १ हजार किंमतीची गावठी दारू, तसेच भऊर येथील नेपाळी वस्ती येथून १ हजार रुपये किंमतीची गावठी दारू, देवळा – कळवण रोड वरील एका हॉटेल मधून ९ हजार ६५० रू रोख रूपये व जुगाराचे साहीत्य असा एकुन १४ हजार ४३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ३० रोजी झालेल्या या कारवाईमुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले तर यापुढे देखील कारवाई चा बडगा सुरूच असेल असे शिरसाठ यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Sunanda Pushkar death case | सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस
- कोल्हापूर : एका वर्षात 25 हजार पासपोर्टची निर्गत
- कोल्हापूर : ग्रामपंचायत इच्छुक उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका
The post नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई appeared first on पुढारी.