नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात

लाच लुचपतच्या जाळ्यात

नाशिक : पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला देण्याच्या मोबदल्यात केटरिंग व्यवसायधारकाकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणुजीव सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. वैभव दिगंबर सादिगले असे पकडलेल्या लाचखोराचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्याचा केटरिंग व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी जे पाणी वापरले जाते त्याचे नमुने तपासणीसाठी तक्रारदाराने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत नमुने दिले होते. या नमुन्यांचा अहवाल चांगला देण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ अणुजीव सहाय्यक वैभव सादिगले याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वैभवला मंगळवारी (दि.२९) लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वैभवविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा :

The post नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात appeared first on पुढारी.