नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवार खरेदी करून द्राक्षमालाची खरेदी करीत पैसे न देता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपत कारभारी ढबले (४५, रा. मातोरी शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते २०२२ दरम्यान, नौषाद मकसुद फारुकी, शमशाद दिलशाद फारुकी (दोघे रा. पखालरोड, नाशिक, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी शेतकऱ्यांना गंडा घातला. संशयितांनी ढबले यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून शिवार खरेदीप्रमाणे द्राक्षमाल खरेदी केला. द्राक्षाचे पैसे धनादेशाद्वारे दिले. मात्र, बँकेत धनादेश न वटल्याने शेतकऱ्यांचे ६५ लाख ८ हजार ९६१ रुपयांचे नुकसान झाले. वारंवार मागणी करूनही फारुकी यांनी पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी नाशिक तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा  appeared first on पुढारी.