नाशिक : नवनिर्वाचित सभापती पिंगळेंचा बाजार समितीत पाहणी दौरा

बाजार समिती पाहणी दौरा,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती देवीदास पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच बाजार समितीमध्ये पाहणी दौरा केला. त्यांनी शेतकरी, व्यापारी व आडतदारांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी पिंगळे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती.

नाशिक बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर दि. २८ एप्रिलला सभापती व उपसभापती पदाची निवडणूक झाली. त्यात पिंगळे गटाने सरशी साधत सभापतिपदी देवीदास पिंगळे, तर उपसभापतिपदी उत्तमराव खांडबहाले याची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर कामकाजाला सुरुवात करत गुरुवारी (दि. १) पिंगळे यांनी सायंकाळी बाजार समितीचा मुख्य बाजार आवारात अचानक भेट दिली. यावेळी पालेभाज्या, फळभाज्या घेऊन आलेल्या शेतकरी वर्गाशी संवाद साधत त्यांच्या अडी – अडचणी जाणून घेतल्या. तसेच आडतदार व व्यापारी यांच्याशीदेखील चर्चा केली.

सभापतींचा सत्कार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून सभापतिपदाच्या निवडीपर्यंत अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर पिंगळे गटाने सभापती व उपसभापती पदी बाजी मारली. शेतकरी, आडतदार व व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अनेकांनी अभिनंदन करत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

हेही वाचा :

The post नाशिक : नवनिर्वाचित सभापती पिंगळेंचा बाजार समितीत पाहणी दौरा appeared first on पुढारी.