नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप

ration
नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा ते नवीन पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येत आहे.
शिधावाटपानुसार नांदगाव तालुक्यात देखील आनंदाचा शिध्याची टप्या टप्प्यात वाटप होत आहे. नांदगाव तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब,  शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यात शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर पामतेलाचा शिधा देण्यात येणार आहे. ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने हा शिधा  वितरीत करण्यात येत आहे.
शंभर रुपयात आनंदाचा शिधा
लाभार्थी कार्डधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार  असून यामध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक लिटर पाम तेल, एक किलो चणाडाळ मिळणार आहे.
* तालुक्यातील वाटप दुकान संख्या – १५६
*  एकूण कार्डधारक लाभार्थी –  ३८८०५
गुढीपाडवा, डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत असून, टप्प्या टप्प्यात शिधा उपलब्ध होत आहे. ,जसा शिधा उपलब्ध होईल तसे वाटप करण्यात येत आहे.  लवकरात लवकर सर्व कार्ड लाभर्थांन पर्यंत शिधा वाटप करण्यात येईल. – बि व्हि कांबळे, पुरवठा आधिकारी , नांदगाव.

हेही वाचा:

The post नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप appeared first on पुढारी.