नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित

संस्कृत नाट्य स्पर्धा निकाल,www.piudhari.news

येवला : पुढारी वृत्तसेवा
नाट्य चळवळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी गेले पाच-सहा वर्षापासून येवल्या सारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या येवला तालुक्यातील नाट्य परिषदेचे सदस्य परिषदेच्या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत.

येत्या रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या मतदार यादीत येवल्यातील नाट्य परिषदेच्या सदस्यांची नावेच नसल्यामुळे सदस्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नाट्य परिषदेच्या येवल्यातील सदस्यांनी थेट अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त खासदार शरदचंद्र पवार यांच्याकडे दाद मागितली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत येवल्यातील सदस्यांची नावे नाहीत, मात्र अनेक दिवंगत सदस्यांची नावे अजूनही स्पष्ट दिसत आहेत. याबाबत सोमवार (दि.१०) रोजी येवल्याच्या सदस्यांनी बैठक घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. याबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त खासदार शरदचंद्र पवार यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.

सर्व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा नाशिक मध्ये सन २०१७-१८ या वर्षात सदस्य नोंदणी केली असून सर्व सदस्यांनी नाट्य परिषद शाखा नाशिकचे सचिव सुनील ढगे यांचेकडे प्रत्येकी रु.१२५०/- प्रमाणे सदस्य शुल्क भरलेले आहे.. सर्व सदस्य रंगभूमी येवल्याच्या माध्यमातून नाट्य चळवळ ग्रामीण भागात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. २०१७ पासून नाट्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, राज्य नाट्य स्पर्धेत प्रत्येक वर्षी नवीन नाटक बसवून सहभाग घेणे, तसेच ग्रामीण भागातील युवक युवतींना नाट्य चळवळीची गोडी लागावी म्हणून दरवर्षी “निळू फुले” करंडकचे आयोजन करीत आहोत. या चळवळीत कार्यरत आम्ही सर्व अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा नाशिक येथे सभासद झालो आहोत, मात्र नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत येवल्यातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्याय द्यावा मिळण्याची विनंती सर्व सदस्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

रंगभूमी येवलाच्या माध्यमातून नाट्य चळवळ येवला सारख्या ग्रामीण भागात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. 2017 पासून नाट्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, राज्य नाट्य स्पर्धेत प्रत्येक वर्षी नवीन नाटक बसवून सहभाग घेणे, तसेच ग्रामीण भागातील युवक युवतींना नाट्य चळवळीची गोडी लागावी म्हणून दरवर्षी “निळू फुले” करंडकचे आयोजन करीत आहोत. या चळवळीत कार्यरत आम्ही सर्व अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा नाशिक येथे सभासद झालो आहोत, मात्र नावे मतदार यादीत नसल्याने शेवटी संस्थेचे विश्वस्त  शरदचंद्र पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे दाद मागितली आहे. – विक्रम गायकवाड, येवला.

हेही वाचा:

The post नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित appeared first on पुढारी.