नाशिक : नावा चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आजपासून

नावा चषक क्रिकेट स्पर्धा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) तर्फे माध्यम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व सम्राट ग्रुप प्रायोजित ‘नावा प्रीमियर लीग’ (एनपीएल) नावा चषक क्रिकेट सामन्यांचा थरार शनिवार (दि. १) पासून महात्मानगर येथील स्टेडियमवर रंगणार आहे. डेन केबल नेटवर्कच्या चॅनेल क्र. १८० तसेच यूट्यूबवर या सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण बघता येणार आहे.

पहिल्या दिवशी दिव्य मराठी – पुण्यनगरी, सकाळ – देशदूत, रेड एफएम – पुढारी, नावा – जनस्थान, दिव्य मराठी – टाइम्स ग्रुप, देशदूत – लोकमत, पुढारी – लोकनामा, जनस्थान – रेडिओ मित, टाइम्स ग्रुप – पुण्यनगरी या संघांमध्ये लढत होईल. एनपीएलचे सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल ॲण्ड व्हिजन केअर, युनिफाॅर्म पार्टनर मधुरा ग्रुप, ट्रॉफी पार्टनर सिंग वाॅरियर्स व मीडिया अ‍ॅडव्हर्टायझिंग, गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्ट्स, फूड्स पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझिंग, नवांकुर पब्लिसिटी, टॉस पार्टनर मयूर अलंकार, पिंगळे पब्लिसिटी, मॉ अ‍ॅडव्हर्टायझिंग, एखंडे अ‍ॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझिंग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट, कृषिदूत बायो हर्बल, ओमपूजा इलेक्ट्रॉनिक, वेध न्यूज डेन केबल नेटवर्कचे रोहित आरोळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिले आहे.

प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विजयी ठरणार्‍या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यांसारखी बक्षिसे दिली जातात. मीडिया जगतामध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता असते. स्पर्धा समितीप्रमुख रवि पवार, सचिन गिते व नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, सरचिटणीस दिलीप निकम, मिलिंद कोल्हे पाटील, राजेश शेळके, विठ्ठल देशपांडे, गणेश नाफडे, दीपक जगताप, प्रताप पवार, श्रीकांत नागरे, सुनील महामुनी, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, श्याम पवार, नितीन शेवाळे, दिनेश गांधी, रविराज खैरनार व नावाचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी स्पर्धेसाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : नावा चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आजपासून appeared first on पुढारी.