नाशिक : निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांचा कार अपघातात मृत्यू

अपघातात मृत्यू,www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्याजवळ धावत्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रामनाथ जवाजी कराड (६७, रा. टोळे, ता. सिन्नर) यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी (दि.२८) दुपारी २.३० च्या सुमारास हा अपघात घडला. कराड हे एका साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून सिन्नरकडे येत होते.  माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्यावर त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले. त्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

कारमध्ये कराड हे एकटेच होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आरंभी सिन्नर व तेथून नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कराड यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांचा कार अपघातात मृत्यू appeared first on पुढारी.