नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

कॉंग्रेसच्या वतीने देशभरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेसच्या वतीने विविध जिल्ह्यांत पदयात्रा काढली जात आहे. नाशिकच्या पंचवटी येथेही कॉंग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे अशी घोषणाबाजी करत पंचवटी कारंजा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व स्वांतत्र्य सैनिक रामचंद्र पांडे, सदू भाऊ भोरे, बाबुराव आटवणे यांना अभिवादन करून पंचवटी ब्लॉक कॉंग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात झाली.

पंचवटी कारंजा येथून गजानन चौक, नागचौक, सेवाकुंज, निमाणीमार्गे पेठ रोड, फुले नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  या ठिकाणी अॅड. पुष्पावती ढवळे व महिला कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे पदयात्रा दत्तनगर, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, मालेगाव स़्डॅण्ड, गंगा घाटावर समारोप करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत, पंचवटी ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार, महिला कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, पंचवटी महिला ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष कल्पना पांडे, प्रदेश सरचिणीस अनिल कोठुळे, सेवा दलाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण धोत्रे, सरचिटणीस राजकुमार जेफ, अनिल बहोत, स्वप्नील पाटील, अरुण दोंदे, दिनेश उन्हवणे, सुरेश मारू, बबलू खैरे, सोमनाथ मोहिते, विजय जाधव, अभिजीत राऊत, अण्णा मोरे, अाशा मोहिते, किशोर खंडेलवाल, रामकिसन चव्हाण, मंगुलाल जाधव, वैभव शेलार, कैलास कडलग, धमर शिंदे, पुष्पावती ढवळे, अनिल बेग यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा appeared first on पुढारी.