नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

सप्तश्रृंगी देवी

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

दीड महिन्यापासून सप्तशृंगीदेवीच्या मुर्तीचे देखभाल व संर्वधन कामामुळे देवी संस्थानाच्या निर्णयानुसार बंद ठेवण्यात आलेले मंदिरसंबधी रविवारी, दि. ४ पत्रकार परिषदेतून नवरात्रौ उत्सवात पहिल्या माळेपासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र सप्तशृंगड हे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश या ठिकाणावरून भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. सप्तशृंगड हे पवित्र तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी भक्तांची सदैव रेलचेल सुरु असते. रोजची मोठ्या प्रमाणातील वर्दळ पाहता गडावरील गर्दीचे प्रमाणे वाढले होत. परंतु गेल्या 22 जुलैपासून सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे वज्रलेप करण्याच्या कामामुळे आणि मूर्ती संवर्धनाचे काम सुरु असल्याने व गडावरील पाय-या दुरुस्तीच्या कामामुळे गडावरील दर्शन गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यापासून सप्तशृंगीचे मंदिर हे बंद ठेवण्यात आले आहे. मात्र सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी नवरात्राै उत्सवामध्ये खुले करण्यात यावे या भक्तांच्या मागणीनुसार लवकराच लवकर गडावरील कामे पूर्णत्वास आले असून नवरात्रौ उत्सवात पहिल्या माळेपासून मंदीर खुले करुन देणार असल्याची घोषणा देवी संस्थानातर्फे पत्रकार परिषद घेऊन रविवारी, दि.4 सप्टेंबरला करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सप्तशृंगगड हे समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचीवर असल्याने व दहा किलोमीटरचा घाट पार करून सप्तशृंगी गडावरती यावे लागते. पूर्वी कोरोना काळामध्ये सप्तशृंगीचे मंदिर हे एक वर्षासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मंदिराचे कामाकरीता दीड ते दोन महिने मंदिर बंद ठेवल्याने सप्तशृंगी गडावरील व्यापाऱ्यांचे अर्थकरण ठप्प झाले होते. मंदिरा संबधी तहसीलदार, देवी संस्थानाचे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व व्यापारी यांसह ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्यात आली. यामध्ये मंदिरातील मूर्तींसह इतर कामे थोड्याफार प्रमाणात बाकी असल्याने तसेच पुरोहित मार्गदर्शन सदरची विधीवत पुजा करून पितृपक्ष झाल्यावर नवराञीच्या पहिल्या दिवशी सप्तशुंगीचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत ग्रामस्थांशी प्राथमिक चर्चा करण्यात आलेली आहे. त्यानुसार घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत रविवारी, दि.4  पञकारपरिषद घेण्याबाबत देवी संस्थानने पञ जाहीर केले आहे.

या कारणांमुळे होते मंदिर बंद :

* पुरातुन काळापासून मुर्तीचे काम करण्यात आलेले नव्हते.
* मुर्तीच्या संर्वधन व्रजलेप संबधी काम करणे गरजेचे होते.
* पावसाळ्यात दि. 22जुलै पासुन देवीचे मंदिर बंद करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन appeared first on पुढारी.