नाशिक : पालखेड धरणातून 17 हजार क्यूसेक्सपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरु

दिंडोरी (नाशिक) :  तालुक्यात दोन – तीन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून, सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तालुक्यातील धरणांतील जलसाठ्यामध्ये वाढ झाली असून, पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS) पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वेगाने वाढल्यामुळे सकाळी ८:०० वा पालखेड धरणातून विसर्ग वाढवून १७ हजार ३१४ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील धरण साठ्यात वाढ झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पालखेड धरणातून 17 हजार क्यूसेक्सपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरु appeared first on पुढारी.