नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

सिडको www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तब्बल १७ एकर जागेवर उभा राहिलेला जुना पेलिकन पार्क व नवीन सेंट्रल पार्क तीन टप्प्यांत पूर्ण होणार असून, त्यासाठी 32 कोटी रुपये निधी लागणार आहे. त्यापैकी 26 कोटी निधी प्राप्त झाला असून, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. याच कामाची पाहणी मनपाच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, उपआयुक्त उद्यान विजयकुमार मुंढे, उपअभियंता हेमंत पठे, उपअभियंता अनिल गायकवाड, कनिष्ठ अभियंता राजेंद्र ठाकूर, राजेंद्र सोनवणे, प्रवीण थोरात यांच्यासह माजी नगरसेविका छाया देवांग, माजी नगरसेवक नीलेश ठाकरे यांनी पाहणी करत माहिती घेतली. यावेळी रश्मी बेंडाळे, डॉ. वैभव महाले, सोनाली ठाकरे, राजेंद्र जडे, दिलीप देवांग, उत्तम काळे आदी उपस्थित होते. वर्षभरात हे सर्व काम पूर्ण करण्यात येणार असून, नाशिककरांना आदर्श सेंट्रल पार्क पाहायला मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यातील कामे अशी…

इन्ट्रन्स प्लाझा, फूड कोर्ट, ॲम्युझमेंट पार्क, साइनेज बोर्ड, बेंचेस, डस्टबिन, स्टेज लाइट, साउंड व्यवस्था, सुलभ टॉयलेट ब्लॉक, पिण्याचे पाणी, पार्किंग, झाडांवर लायटिंग, मोठे जनरेटर, लॉन्स लागवड करणे, ॲडव्हेंचर पार्क, उद्यानाच्या देखभाल करण्याच्या खर्चाचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.