नाशिक : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने मारहाण

मारहाण

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा

पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरुन फूल विक्रेत्यावर विळ्याने वार केल्याची घटना शुक्रवार (दि. 31 मार्च) रोजी घडली.

रत्नाकर सखाराम जाधव (42) याने छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. जाधव यांनी नामपूर शिवारात प्लाॅट खरेदी केला होता. हा प्लॉट ज्या किमतीत घेतला. त्या किमतीत परत देण्याच्या कारणावरुन आरोपी किशोर दौलतराव शेवाळे व नितीन दौलतराव शेवाळे हे दूरध्वनीवरुन धमकी देत होते. त्यामुळे जाधव यांनी 27 जानेवारी 2022 ला कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीचा राग मनात धरुन शुक्रवारी आरोपी किशोर व नितीन यांनी जाधव हे फूल विक्री करत असताना त्यांच्या मानेवर व हातावर विळ्याने वार करुन त्यांना जखमी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने मारहाण appeared first on पुढारी.