नाशिक : प्रतिकूलतेवर मात करुन महेंद्र सीए परीक्षेत उत्तीर्ण

सीए परीक्षा झाला पास,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : खर्डे ता. देवळा येथील महेंद्र भास्कर जाधव हा चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाला. खर्डे व परिसरातून सीए उत्तीर्ण झालेला महेंद्र हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

महेंद्र जाधव याचे इयत्ता १० पर्यंतचे शिक्षण खर्डे येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण देवळा येथे झाल्यानंतर त्याने नाशिकला चार्टर्ड अकाउंटंट्सची परीक्षा दिली. ही परीक्षा एकूण दोन ग्रुप मध्ये झाली. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतांनाही जिद्द व चिकाटीच्या जोरावर यात त्याने सर्वाधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.

महेंद्र जाधव हा वसाकाचे सेवानिवृत्त कर्मचारी व खर्डे येथील प्रगतिशील शेतकरी भास्कर जाधव यांचा चिरंजीव आहे. त्याला काका आर्किटेक्ट कृष्णा जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याच्या या यशाबद्दल खर्डे सह परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील उच्च शिक्षणासाठीच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील हुशार आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अति वापर टाळून अभ्यासात लक्ष केंद्रित करावे. कुठल्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी व सातत्य असल्यास हमखास यश मिळते .- महेंद्र जाधव, खर्डे

हेही वाचा :

The post नाशिक : प्रतिकूलतेवर मात करुन महेंद्र सीए परीक्षेत उत्तीर्ण appeared first on पुढारी.