नाशिक : बँक ऑफ बडोदा मधून भामट्याचा दोन लाख रुपये घेऊन पोबारा 

चोर

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा :

नाशिक – पुणे रोड वरील आशीर्वाद स्टॉप जवळ असलेल्या बँक ऑफ बडोदा नाशिक रोड शाखेतून भामट्याने दोन लाख रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. अंकुर सोमनाथ लाटे राहणार शिवराम नगर, टाकली रोड, जेल रोड हे आपल्या आई लीलाबाई सोमनाथ लाटे सोबत बँक ऑफ बडोदा नाशिक रोड शाखेत नेहमीप्रमाणे पैसे भरण्यासाठी आले होते. अंकुर याने बँकेत आल्यावर दोन लाख रुपये स्लीप भरून कॅशियर काउंटर वर काचेच्या आत दोन लाख रुपये रोख ठेवून आई लीलाबाई हिला काउंटर जवळ थांबवून अंगठ्यासाठी स्टॅम्प पेड घेण्यासाठी दुसऱ्या काउंटरवर गेले तेवढ्यात एक भामट्याने रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेचा संपूर्ण प्रकार बँकेच्या सीसी टीव्ही कॅमेरात मिळून आला असून पोलिस त्याआधारे आरोपी भामट्याचा शोध घेत आहेत.  अंकुर लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शार्माले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : बँक ऑफ बडोदा मधून भामट्याचा दोन लाख रुपये घेऊन पोबारा  appeared first on पुढारी.