गोपाल महाराजाचा भक्ताला आशीर्वाद, 21 लाख घेऊन झाला पसार ; काय घडलं?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भक्तास आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन संशयितांनी भक्ताच्या घरातून २१ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना जेल रोड येथील भैरवनाथनगर येथे घडली. याप्रकरणी भक्ताने उपनगर पोलिस ठाण्यात गोपाल महाराज व त्याच्या जोडीदाराविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. भैरवनाथनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित गोपाल महाराज याच्यासमवेत नोव्हेंबर २०२३ मध्ये जेजुरी, …

The post गोपाल महाराजाचा भक्ताला आशीर्वाद, 21 लाख घेऊन झाला पसार ; काय घडलं? appeared first on पुढारी.

Continue Reading गोपाल महाराजाचा भक्ताला आशीर्वाद, 21 लाख घेऊन झाला पसार ; काय घडलं?

‘इयरपॉड’ वापरण्याचा मोह पडला महागात, सराईत चोरटे जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंगल्यात घरफोडी करून चोरी केलेला नामांकित कंपनीचा ‘इयरपॉड’ वापरण्याचा मोह चोरट्यांना महागात पडला. इयरपॉड वापरल्याने तसेच घरातील सीसीटीव्हीत चोरट्याच्या हालचाली कैद झाल्याने दोघा सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. रोहन संजय भोळे (३७ रा. जयप्रकाश सोसायटी) आणि ऋषिकेश मधुकर काळे (२८ रा. गंधर्वनगरी) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत. …

The post 'इयरपॉड' वापरण्याचा मोह पडला महागात, सराईत चोरटे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading ‘इयरपॉड’ वापरण्याचा मोह पडला महागात, सराईत चोरटे जेरबंद

सिमेन्स’मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक

सिडको : पुढारी वृत्तसेवा; एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी सिमेन्स कंपनीतील चोरी प्रकरणी सुरक्षारक्षक, भांडार विभागातील कर्मचाऱ्यांसह तब्बल १५ जणांना अटक करत त्यांच्याकडून ३९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी अंबडच्या सिमेन्स कंपनीतील ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात …

The post सिमेन्स'मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading सिमेन्स’मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक

जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

जळगाव : जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोरट्यांनी कापसाच्या गोण्या, मशीन, जनावरे, मोटरसायकल अशा विविध मुद्देमालाच्या चोऱ्या करून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. वरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेतकरी उदय नारायणराव देशमुख यांच्या शेतात असलेल्या शेडचे कुलूप तोडून त्यामधून २४ हजार रुपयांच्या कापसाच्या गोण्या व सहा हजार रुपयांच्या कोंबड्या सावतर शिवारामधून …

The post जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; केवळ यात्रेत मौजमजा करण्यासाठी चोरी करणाऱ्या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले असून, त्यातील दोघांना अटक केली आहे. आगसखिंड येथील अमिर स्क्रॅप सेंटर दुकानातून रात्री टेबलच्या ड्राॅवरमध्ये असलेली ७५ हजार रुपयांची रोकड व मोबाइल फोन चोरीस गेला होता. याबाबत सिन्नर पोलिसांसह …

The post नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद

Nashik Crime : अशोकस्तंभ येथे चोरट्यांनी गोडाऊन फोडले

नाशिक : अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन फाेडून एक लाखांचे वाहनांचे स्पेअर्स पार्ट लांबविल्याचा प्रकार अशोकस्तंभ परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्कल सिनेमा कंपाऊंडमधील बॉम्बे मोटार स्टोअर्स फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १० हजारांचे चारचाकी वाहनांचे वेगवेगळे स्पेअर्स पार्ट चोरून नेले. याप्रकरणी उमेश चंद्रकांत पंढरपूर (५४, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post Nashik Crime : अशोकस्तंभ येथे चोरट्यांनी गोडाऊन फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अशोकस्तंभ येथे चोरट्यांनी गोडाऊन फोडले

नाशिक : पुरस्कारप्राप्त सायकलपटूच फोडायचा दानपेट्या, पोलिसांनी ‘असा’ पकडला

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी शहरात एकाच रात्री तीन ठिकाणांच्या मंदिरातील पूजेचे साहित्य व दानपेटयातील रक्कम चोरणाऱ्या भुरट्या चोराला इगतपुरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. विशेष म्हणजे हा भुरटा जिल्हास्तरीय पातळीवर पुरस्कारप्राप्त सायकलपटू आहे. शहरातील नेहरू चौक भागातील तीन लकडी पुलाजवळील बालाजी मंदिर, बजाज भवनाजवळील शीतलामाता मंदिर, बाजारपेठेमधील शिवमंदिर या ठिकाणी पहाटेच्या …

The post नाशिक : पुरस्कारप्राप्त सायकलपटूच फोडायचा दानपेट्या, पोलिसांनी 'असा' पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुरस्कारप्राप्त सायकलपटूच फोडायचा दानपेट्या, पोलिसांनी ‘असा’ पकडला

नाशिक : वृद्धाच्या पेन्शनची रक्कम लांबविणारा भामटा तासाभरात जाळ्यात

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा वृद्धाच्या पेन्शनच्या रोख रकमेसह त्यांचा मोबाईल मोटारसायकलवर येऊन बळजबरीने हिसकावुन घेवुन चोरी करणाऱ्या संशयिताच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या तासाभरात मुसक्या आवळल्या. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,रंगनाथ बबनराव माळवे (७८, धंदा सेवानिवृत्त, नवनाथ हार्डवेअर समोर त्रिमुर्ती चौक, सिडको ) हे पाटील नगर येथील पोस्ट ऑफिस मधून त्यांच्या पेन्शनची …

The post नाशिक : वृद्धाच्या पेन्शनची रक्कम लांबविणारा भामटा तासाभरात जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृद्धाच्या पेन्शनची रक्कम लांबविणारा भामटा तासाभरात जाळ्यात

नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरातील एका कॅफे दुकानात कूक असलेल्या तरुणाने इतर दोन साथीदारांच्या मदतीने ५० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि २२ हजार रुपये रोख असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. राकेश अहिरे यांचे पंचायत समितीच्या शेजारी कॅफे आहे. या दुकानात कूक असलेल्या तरुणाने दुकानात १५ दिवसांचे हिशेबाचे ठेवलेले २२ …

The post नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा

नाशिक : बँक ऑफ बडोदा मधून भामट्याचा दोन लाख रुपये घेऊन पोबारा 

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : नाशिक – पुणे रोड वरील आशीर्वाद स्टॉप जवळ असलेल्या बँक ऑफ बडोदा नाशिक रोड शाखेतून भामट्याने दोन लाख रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. अंकुर सोमनाथ लाटे राहणार शिवराम नगर, टाकली रोड, जेल रोड हे आपल्या आई लीलाबाई सोमनाथ लाटे सोबत बँक ऑफ बडोदा नाशिक रोड शाखेत नेहमीप्रमाणे पैसे भरण्यासाठी …

The post नाशिक : बँक ऑफ बडोदा मधून भामट्याचा दोन लाख रुपये घेऊन पोबारा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँक ऑफ बडोदा मधून भामट्याचा दोन लाख रुपये घेऊन पोबारा