नाशिक : वृद्धाच्या पेन्शनची रक्कम लांबविणारा भामटा तासाभरात जाळ्यात

arrested,www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

वृद्धाच्या पेन्शनच्या रोख रकमेसह त्यांचा मोबाईल मोटारसायकलवर येऊन बळजबरीने हिसकावुन घेवुन चोरी करणाऱ्या संशयिताच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या तासाभरात मुसक्या आवळल्या.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,रंगनाथ बबनराव माळवे (७८, धंदा सेवानिवृत्त, नवनाथ हार्डवेअर समोर त्रिमुर्ती चौक, सिडको ) हे पाटील नगर येथील पोस्ट ऑफिस मधून त्यांच्या पेन्शनची ३० हजार रुपये रक्कम काढून पिशवी मध्ये ठेवून पायी घरी जात असतांना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञाताने त्यांच्या हातातील पिशवी बळजबरीने हिसकावुन घेवुन चोरी करून निघून गेला. या प्रकरणाची माहिती माळवे यांनी तात्काळ अंबड पोलिसांना कळवल्यावर गुन्हे शोध पथकाने तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली असता पोलीस शिपाई सागर जाधव यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फुटेज मधील व्यक्ती हा अंबड पोलीस ठाणे हददीतील सावतानगर या भागातील रहिवासी आहे. यावरून पोलिसांनी संशयावरून संशयित आरोपी खुशाल शरदचंद्र मोरे रा , सावतानगर, सिडको याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवी चे उत्तरे दिले मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदरहू गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून ३० हजार रुपये रोख व एक मोबाईल असा ऐवज जप्त केला. हि कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, अंमलदार किरण गायकवाड, संदिप भुरे, अनिल ढेरंगे, घनश्याम भोये, राकेश राउत यांनी केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित खुशाल मोरे याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले व पोलीस शिपाई अनिल अनिल ढेरंगे करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : वृद्धाच्या पेन्शनची रक्कम लांबविणारा भामटा तासाभरात जाळ्यात appeared first on पुढारी.