नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार

गुटखा तस्करी प्रकरण(crime)

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा

इगतपुरी पोलिसांनी मुंबई -आग्रा महामार्गावर गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटीचा अवैध गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेला संशयित राज किशनकुमार भाटिया याला जयपूर येथून अटक केली होती.

राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सूत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत असल्याचे तसेच भाटिया हा नाशिक येथील स्वयंघोषित आरोग्यदूत संशयित तुषार जगताप याच्या संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर बुधवारी जगताप यास अटक केली होती. त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटखा तस्करीचे नेटवर्क चालवत होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाल्याने त्यांनी जगताप यास अटक केली होती. दरम्यान, याच दिवशी इगतपुरी न्यायालयात जगताप यास जामीनदेखील मंजूर झाला होता. दरम्यान, जगताप हा राज्यातील बड्या नेत्यांचा निकटवर्तीय असून, त्याचा गॉडफादर काेण याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

The post नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार appeared first on पुढारी.