नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा

दुचाकी चोर www.pudhari.news

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका कॅफे दुकानात कूक असलेल्या तरुणाने इतर दोन साथीदारांच्या मदतीने ५० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि २२ हजार रुपये रोख असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

राकेश अहिरे यांचे पंचायत समितीच्या शेजारी कॅफे आहे. या दुकानात कूक असलेल्या तरुणाने दुकानात १५ दिवसांचे हिशेबाचे ठेवलेले २२ हजार रुपये व ५० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, एचडी ४१८८) असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत राकेश रमेश अहिरे यांनी तीन संशयितांविरोधात चांदवड पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा appeared first on पुढारी.