नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबादरोडसह शहर परिसरातील अपघातप्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅकस्पॉट अपघातमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. संबंधित ब्लॅकस्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरनियोजन विभागामार्फत रेखांकनाचे (डिमार्केशन) काम सुरू असून, या विभागाने ३१५ अतिक्रमणधारकांना मागील महिन्यात नोटीस बजावली होती. आता अंतिम नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्याची ताकीद दिली जाणार आहे.

औरंगाबादरोडवरील मिरची चौकात गेल्या वर्षी ८ आॉक्टोबर रोजी पहाटे भयानक अपघात घडला आणि या अपघातामुळे खासगी बसला लागलेल्या आगीत १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यु झाला होता. या अपघातामुळे पोलीस, महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघात स्थळांची पाहणी केल्यानंतर नाशिकसह सर्वच महानगरांमधील ब्लॅकस्पॉट शोधून अपघातमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर नाशिक महापालिकेने तत्काळ पावले उचलत मिरची चौक तसेच त्यालगत असणाऱ्या चौकांची पाहणी करून त्याठिकाणचे अतिक्रमणे हटविली होती. तर महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, नॅशलन हायवे अॅथॉरिटी, वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून शहर व परिसरातील २६ अपघातप्रवण क्षेत्र शोधून काढले. तर महापालिकेने वैयक्तिक सर्वेक्षण करत १३६ अपघातस्थळ शोधून काढत ते अपघातमुक्त कऱण्यासाठी पावले उचलली आहेत. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीतही व्दारका, मुंबई नाका यासह विविध ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Alibaba Exits India : अलीबाबाने भारतातून व्यवसाय गुंडाळला; पेटीएममधील संपूर्ण शेअर्स काढले

मनपासह इतरही विभागांनी शोधून काढलेल्या ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी नगरनियोजन विभागाकडून रेखांकन करण्यात येत असून, या विभागाने ३१५ अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे. आता पुन्हा अंतिम नोटीस बजावली जाणार आहे. ३१५ पैकी ९० अतिक्रमणधारकांचे रेखांकन पूर्ण करून ते अतिक्रमण निर्मुलन विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती नगरनियोजन विभागाने कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

२६ ठिकाणी उपाययोजनांसाठी निविदा

शहरातील औरंगाबादरोडवरील मिरची चौक तसेच नांदूर नाका यासह २९ ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपाययोजना केल्या जाणार असून, त्यासाठीची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. अडीच कोटी रूपयांचा निधी त्यासाठी खर्च होणार आहे. उपाययोजनेअंतर्गत स्पीड टेंमलर्स, थर्मोप्लास्ट पेंट, डेलिमिएटर्स, डिव्हायडर्स, कॅटआईज, फॅनिंग, सूचना फलक,

२६ ठिकाणी उपाययोजनेसाठी निविदा प्रसिध्द करण्यात आल्या असून, उर्वरित १३६ ठिकाणी देखील उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी निधीची तरतूद झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. शहर व परिसर अपघातमुक्त करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता- मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार appeared first on पुढारी.