नाशिक : भरधाव थारची कंटेनरला धडक, १ ठार, ५ जखमी

नाशिक : इगतपुरी पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गावरील आठव्या मैल परिसरात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव थार ने कंटनेरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून १ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई नाशिक मार्गावर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती समजताच गोंदे फाटा येथे आहोरात्र अपघातग्रस्तांच्या सेवेत उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समय सुचकतेने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असणारे महिंद्रा कंपनीचे थार वाहन क्र. एम. पी. 09 डब्लु. एच.9936 या वाहनाने पुढे जात असलेल्या कंटेनर क्र. एम. एच. 46 ए. आर. 7417 याला पाठीमागून ठोस मारून कंटेनरच्या पाठी मागील बाजूस आतमध्ये घुसले. या अपघातात महिंद्रा थार गाडीचा चालक विश्वजीत सोगरा हा जागीच ठार झाला आहे. तर आकाश ढोलपुरे, अहमद वसारी, अमित, अक्षय कानडे, शक्ती ठाकुर हे ५ जण गंभीर जखमी झाले आहे.

अपघात घडल्याची माहिती कळताच घटनास्थळी घोटी केंद्राचे महामार्ग सुरक्षा पोलीस, पिंपळगाव बसवंत येथील पेट्रोलिंग पोलीस, वाडीव-हे व नाशिक तालुका पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

हेही वाचा :

The post नाशिक : भरधाव थारची कंटेनरला धडक, १ ठार, ५ जखमी appeared first on पुढारी.