नाशिक : मयतांच्या अंत्यविधी, दफनविधी’चा खर्च ग्रामपंचायत करणार, चाटोरी गावाचा ठराव

अंत्यविधीचा खर्च ग्रामपंचायत करणार,www.pudhari.news

सायखेडा(जि.नाशिक) : चाटोरी येथील ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, गावातील मयत व्यक्तींचा अंत्यविधी, दफनविधी यासाठीचा खर्च करणार आहे. याचा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. गोदावरी तिरावर वसलेले सुमारे साडे सहा हजार लोकवस्तीचे चाटोरी हे गाव अनेक योजना राबवित आहे. त्यातच गावातील मयत व्यक्तींच्या अंत्यविधी, दफनविधीसाठी लागणारी फुल (लाकडे), बरके यांचा खर्च ग्रामपंचायतीमार्फत होणार आहे.

हा निर्णय गावातील सर्व समाजांसाठी असल्याचे सरपंच अरुणा हांडगे, उपसरपंच बाळासाहेब हिरे, ग्रामसेविका एस. जी. सनेर, ग्रामपंचायत सदस्य सरिखा हांडगे, अनिता कदम, जिजाबाई खेलुकर, शोभा घोलप, द्रौपदाबाई भोईर, सविता डमाळे, भाऊसाहेब घोलप, राहुल गायकवाड, समाधान खेलुकर, लक्ष्मण धोंगडे, भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितले. तर या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मयतांच्या अंत्यविधी, दफनविधी'चा खर्च ग्रामपंचायत करणार, चाटोरी गावाचा ठराव appeared first on पुढारी.