नाशिक : याद येते सांजवेळी; शोधतो मी बार ठेले..!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

याद येते सांजवेळी
शोधतो मी बार ठेले,
अन विसराया दु:ख माझे
रोज घेतो चार पेले

यासारख्या विविध रचनांनी गझल विश्वास मैफल उत्तरोत्तर बहरली. अजय बिरारी यांनी सांजवेळी तिच्या आठवणींचे काहूर मनात आल्यानंतरची अवस्था ‘रोज घेतो चार पेले’ या रनचनेतून पेश केली. विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘गझल विश्वास’चे चौथे पुष्प क्लब हाउस, सावरकरनगर येथे पार पडले. राधाकृष्ण साळुंके, अजय बिरारी, नंदकिशोर ठोंबरे, प्रवीण पगार, कुणाल शिरूडे यांनी गझल सादर केल्या. मोबाइल व तिच्याशी असलेले नाते साध्या विश्‍वासावर अवलंबून असते. त्याबाबतची अवस्था प्रवीण पगार यांनी गझलेतून मांडली.

विश्‍वासाचा बंध आमचा
घट्ट आणखी होवुन जातो,
तिच्याकडे मी जेव्हा
माझा फोन मोकळा सोडून जातो

कुणाल शिरूडे यांनी आयुष्याची वाट किती दूरपर्यंत आहे ते सांगता येत नाही, पण वाटेवर चालण्याचा मंत्र दिला. वाट माझी खेळ नाही सांगतो, वाट माझी चालले ते संपले. यावेळी कवयित्री व अनुवादिका डॉ. सुलभा कोरे, विश्वास ठाकूर, साहित्यिक राजेंद्र ठाकूर उपस्थित होते. अलका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : याद येते सांजवेळी; शोधतो मी बार ठेले..! appeared first on पुढारी.