नाशिक : युवकाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

गुन्हा www.pudhari.news

नाशिक : सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने गंगापूर रोडवर निर्माणाधीन इमारतीत युवकाच्या मृत्यूप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात ठेकेदार, बांधकाम पर्यवेक्षक, अभियंता व बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अर्चित गॅलक्सी कन्स्ट्रक्शन या बांधकाम साइटवर काम करणार्‍या पुनित उत्तमराव मडावी (39, रा. गंगापूर रोड, मूळ रा. छत्तीसगड) यांचा मुलगा अरुण मडावी (18) हा 31 मार्चला सकाळी 11.30 च्या सुमारास वडिलांना डबा देण्यासाठी आला होता. मिनी क्रेनमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने तेथील लोखंडी फ्रेम अरुणच्या डोक्यात पडली. त्यात अरुणचा मृत्यू झाला. त्यामुळे पुनित यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा:

The post नाशिक : युवकाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.