नाशिक : रोजगार हवाय… शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आज विभागीय मेळावा

employment

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मविप्र संस्था संचलित राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 14) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत गंगापूररोडवरील राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात 23 नामांकित कंपन्या व नियोक्ते सहभागी होणार असून, 3 हजारांहून अधिक पदांसाठी उमेदवारांना संधी मिळणार आहे. मेळाव्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश लिमिटेड, एमएसएल ड्राइव्ह लाइन सिस्टीम्स, डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, डब्ल्यूएनएस ग्लोबस सर्व्हिसेस, बीएम इलेक्ट्रॉनिक्स, व्हीआयपी इंडस्ट्रीज, डी. सोर्स, डीजी डाटा सोल्युशन्स, बीव्हीजी इंडिया, अभिनव इन्स्टिट्यूट, भाविन व्हिल्स, कनेक्ट बिझनेस सोल्युशन्स, इनसाइट, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, धुमाळ पोल्ट्री, कॅटाफार्मा केमिकल्स, मिराक्वई व्हेन्च्युअर्स, यशस्वी अकॅडमी, युवाशक्ती फाउंडेशन आदी नामांकित कंपन्यांनी नोंदणी केली आहे. उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी व प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : रोजगार हवाय... शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आज विभागीय मेळावा appeared first on पुढारी.