नाशिक पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याला बसला आहे. एरवी असलेल्या आवकेपेक्षा ७५ टक्क्यांनी कमी आवक झाल्याने बाजारभाव उसळले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहे.
जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षे, कांदे, नगदी पिके यांसोबतच भाजीपाल्याचे देखिल नुकसान मोठ्या प्रमणात झाले आहे. हे नुकसान झाल्याने रोज बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या भाजीपाल्याची आवक अतिशय कमी झाली. इतर वेळी दोन ते अडीच हजार क्विंटल असलेली भाज्यांची आवक आज (दि २७) चारशे क्विंटल झाली आहे. मेथी, शेपू, यांच्यासह इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये तुलनेने वाढ दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी अगदी पाच ते दहा रुपयांवर आलेली कोथिंबिरची मोठी जुडी आता ३० रुपयांवर गेली आहे. याचबरोबर मेथी आणि शेपु मोठी जुडी १५ ते २० रुपयांना मिळत आहे.
बाजार समितीतील भाज्यांचे दर (क्विंटलमध्ये)
भाजी | किमान-कमाल भाव (रु.) |
---|---|
भेंडी | 1665-3330 |
गवार | 10000-15000 |
वाटाणा | 2000-4100 |
कोथिंबिर | 900-2800 |
मेथी | 700-1500 |
शेपु | 800-1600 |
टोमॅटो | 400-4000 |
वांगी | 2500-4500 |
शिमला मिरची | 2500-5000 |
भोपळा | 670-1335 |
कारले | 585-1385 |
डोडका | 3335-5000 |
- Uttarkashi tunnel rescue : बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण
- Weather Update : शहरावर दिवसभर आभाळमाया!
The post गारपिटीने भाजीपाला महागला appeared first on पुढारी.